*पळसखेडा येथे महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.*
*” पळसखेडा बघायला मिळाले सामाजिक बांधिलकीचे अनोखे दृश्य”*

सोयगाव :- तालुक्यातील पळसखेडा या गावामध्ये आज महावीर स्वामी जन्मोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला जैन स्थानक येथे प्रभू महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली व मिरवणूक राम मंदिर मार्गे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोहचली त्या ठिकाणी महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन जैन समाजाचे जेष्ठ हिरालाल सोनी व इंदरलालजी जैन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,जैन बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मिरवणूक संपूर्ण गावातून संत तुकाराम मंगल कार्यालय मार्गे पुन्हा जैन स्थानक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली जैन स्थानक येथे पळसखेडा गावाचे पोलीस पाटील गणेश घोंगडे,वाकोद गावाचे पोलीस पाटील संतोष देठे, कु. पूजा जैन, पळसखेडा श्रीसंघाचे अध्यक्ष शंकर लाल जैन या सर्वांनी महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले तसेच काल झालेल्या विश्व नवकार दिवस निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी देशावासियांना दिलेल्या नऊ संकल्पांची अंमलबजावणी करण्याचा विश्वास देखील या ठिकाणी जैन बांधवांनी व ग्रामस्थांनी दर्शवला.
मिरवणूक अत्यंत शांततेत पार पाडण्यासाठी फरदापुर पोलीस स्टेशनचे सहकार्य लाभले.
त्याचबरोबर पळसखेडा मध्ये पुन्हा एकदा सामाजिक सुलोख्याचे दृश्य बघायला मिळाले जैन समाज अल्पसंख्यांक असताना गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून महावीर स्वामी यांच्या जयंती थाटामाटात मोठा उत्साहात साजरी करण्यासाठी अथांग प्रयत्न केले याबद्दल सुनील जैन,पंकज जैन, कचरूलाल जैन,मनोज जैन,प्रकाश चोपडा शांतीलाल जैन, प्रितेश जैन,नंदलाल जैन सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनी जैन यांनी आभार व्यक्त केले.