विश्व नवकार दिवस निमित्ताने पळसखेडा येथे सामूहिकरीत्या नवकार मंत्र जप.

प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव:- दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी जितो पुरस्कृत विश्व नवकार दिवस निमित्ताने पळसखेडा येथील जैन बांधवांनी सामूहिक रित्या जैन स्थानक मध्ये नवकार मंत्राचे जप केले.
आपल्या देशा बरोबर 108 देशांमध्ये 9 एप्रिल रोजी सकाळी 08:01 ते 0.9:36 पर्यंत नवकार मंत्राचे जप करण्यात आले या जपा मध्ये पळसखेडा येथील जैन बांधवांनी देखील सामूहिकरीत्या सहभाग घेतला यावेळी राहुल सोनी, शंकरलाल जैन, कचरूलाल जैन, इंदरचंद चोपडा, शांतीलाल जैन, निलेश चोपडा, मनोज गुलेचा, गौरव सोनी, महेंद्र जैन, मुकेश जैन, नंदलाल चोपडा, पंकज जैन, आदी पुरुष व महिला मोठ्या सखेत उपस्थित होत्या.