गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक इनोव्हा गाडीत; सोयगाव तालुक्यात गुन्हा दाखल

सोयगाव ता..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

सोयगाव, ता. १५ जुलै – राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा गुटखा व सी जर्दा तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करत असलेल्या इनोव्हा गाडी क्रमांक एम एच 46 ए एक्स 0055 मध्ये महाराष्ट्राच्या प्रतिबंधित असलेले 2017 हजार तीनशे सात रुपये किमतीचा गोवा गुटखा त्यासोबत एक जागा तंबाखू वाहतूक करीत असताना मिळून आला असून गुन्हा दाखल सोयगाव पोलीसांनी कारवाई करत असून या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील महामार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद इनोव्हा गाडी (क्रमांक MH-46एएक्स0055) दिसून आली. तपासणी केली असता गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखू पाकीटं आणि इतर प्रतिबंधित पदार्थ सापडले. या प्रकरणी वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई फर्दापूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. साबळे सह पोलीस निरीक्षक पोलीस उ.निरीक्षक चंद्रशेखर एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सोयगाव पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.