दुचाकी वरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी मुद्देमालसह ताब्यात

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

सोयगाव / सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ७ हजाराची दारू व २० हजार रुपयाची दुचाकी जप्त केली ही कारवाई येथे करून दोघांवर फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शनिवारी सायंकाळी फर्दापूर पोलिसांना फर्दापूर सोयगाव मार्गाने दोघे दुचाकीवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली होती यानुसार फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे पोना. निलेश लोखंडे पोकॉ. संतोष उबाळे यांनी फर्दापूर सोयगाव मार्गाने दुचाकीचा (एम एच १९ बीए)
५४८४ पाठलाग करत जंगला तांडा गावालगत
दोघांना पकडले त्याच्या जवळ असलेल्या दोन बॉक्समध्ये असलेली ७ हजार रुपये किमतीचा
२०० बॉटल व २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी नाथप्रसाद शंकर इंगळे (वय २५ रा. सोयगाव) व आनंदा भगवान ठाकरे
(२५ रा. आमखेडा ता. सोयगाव) यांना अटक केली पुढील तपास पो.ना. निलेश लोखंडे हे करीत आहे