खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित सदस्याचा बनोटी येथील अमृतेश्वर गोमुख देवस्थान येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार..
सोयगाव ता..
प्रतिनिधी संतोष गर्दे..
सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.14, खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही असे स्पष्ट करीत सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाला अधिक सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी बनोटी ता. सोयगाव येथे व्यक्त केले नुकत्याच झालेल्या तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास पॅनलचे 17 पैकी 13 उमेदवार निवडून आले. त्यानिमित्ताने बनोटी येथील श्री. अमृतेश्वर गोमुख देवस्थान येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार, मतदारांचे आभार व स्नेह भोजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते.याप्रसंगी शिवसेनेचे उबाठा चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड , जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर आबा काळे, शिवसेना ( उबाठा )चे जिल्हाउपाध्यक्ष दिलीप मचे, सिल्लोड शिवसेना तालुका प्रमुख मारोती पा. वराडे, कृउबा समितीचे संचालक दारासिंग चव्हाण,सतीश ताठे, शिवअप्पा चोपडे, ध्रुपताबाई सोनवणे, सुरेखा तायडे , नवनिर्वाचित संचालक संजय निकम, सुभाष बोरसे, मुरलीधर वेहळे, भगवान लहाने, राधेश्याम जाधव, रंगनाथ वराडे, चंदाबाई राजपूत, प्रतिभा सोळुंके, भारत तायडे, मोतीराम तेली तसेच स्वप्नील पाटील, अतुल बोरसे, सुभाष वाडकर, सागर पाटील, अभयसिंग पवार, मंगेश पाटील, धरमसिंग सोळुंके, कुणाल राजपूत ,विजू नगरे, सुपडू पाटील, अनिल सोळुंके आदींसह मतदार व परिसरातील शेतकरी, गावकरी उपस्थित होते.पुढे बोलत असतांना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगाव तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कायम प्रयत्न केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकास कामे करण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यानंतर बनोटी व इतर ठिकाणच्या उपबाजाराच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देवू असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले इतरत्र सहकार क्षेत्र डबघाईला येत असतांना सोयगाव मध्ये मात्र सहकार क्षेत्राचा सातत्याने विकास होत आहे. सोयगाव तालुक्यात विकासाच्या माध्यमातून बाजार समितीचा होत असलेला विकास त्यासोबतच जिनिंग प्रेसिंग, व फळबाग – भाजीपाला प्रकल्प येथे लवकरच सुरू होणार असल्याने याचा फायदा खरेदी विक्री संघाला होईल.