सूर्योदय स्कूल गुरुपौर्णिमेनिमित्त मातापिता पूजन सोहळा उत्साहात संपन्न
शेंदुर्णी ता.जामनेर
येथील सूर्योदय किड्स स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने मातापिता पूजन यांसारख्या भावनिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना वंदन करून गुरुच्या संकल्पनेला एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. गायत्रीताई दुसाने (कीर्तनकार), स्वामी समर्थ केंद्राचे डॉ. मोहन बडगूजर, श्री. राजेंद्र विसपुते, तसेच संस्थेचे संचालक श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी मुलांना आशिर्वाद देत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
गायत्रीताई दुसाने ह्यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून गुरुपौर्णिमेचे आणि मातापित्याच्या महत्त्वाचे अप्रतिम विवेचन केले. त्यानि संबोधित केले की, “पालक हेच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचं प्रेम हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे मुलांनी लहान वयातच त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत आवश्यक आहे.”
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या लहानशा हातांनी आपल्या आई-वडिलांचे विधिपूर्वक पूजन केले. मुलांच्या हातून ओवाळणी, फुलं आणि चरणस्पर्श होतानाचे क्षण अक्षरशः भारावून टाकणारे होते.
सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी गुरु महात्म्यवर नाटिका सादर केली. त्यासोबत विद्यार्थ्यांनी भाषणतुन गुरु विषयी महत्व संगीतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी पालकांनी परिश्रम घेतले.