सोयगाव: सोयगावच्या जिल्हा परिषद विश्राम गृहाला सांडपाण्याचा विळखा : बांधकाम विभाग अनभिज्ञ
मुख्य प्रवेश द्वारा समोरच साचले पाण्याचे डबके, संरंक्षणभिंत कोसळण्याची शक्यता

प्रतिनिधी संतोष गर्दे जिल्हाछत्रपती संभाजीनगर
सोयगाव
येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्राम गृहाच्या मुख्य प्रवेशद्वासमोरच सोयगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवणूक टाकीतील ओव्हारप्लोच्या पाण्याचे रस्त्यावर डबके साचले आहे.पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे विश्राम गृहात प्रवेश करणे मुश्किल झाले असून संरक्षण भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयगाव पंचायत समिती कार्यालयाच्या समोरच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्राम गृह आहे. तीन महिन्यांपूर्वी या विश्राम गृहासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पन्नास लाख रुपये खर्च करून डागडुजी व संरक्षण भिंत बांधकाम केले आहे. विश्रामगृहाच्यालागून सोयगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नगर पंचायत पाणी पुरवठा विभागाच्या साठवणूक टाकीचे ओव्हर प्लोच्या (सांडपाणी)निचरा होत नसल्याने हे पाणी विश्राम गृहाच्या प्रवेशद्वारा समोर साचून मोठे तळे साचले आहे.त्यामुळे विश्राम गृहात जाण्यासाठी अतिथींना वाट शोधावी लागते.तसेच हे सांडपाणी नव्याने बांधकाम केलेल्या संरक्षण भिंतीत जाऊन भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व नगर पंचायत दुर्लक्ष करीत आहे.
फोटो ओळ : – सोयगाव – जिल्हा परिषद विश्राम गृहाच्या प्रवेश द्वारावर साचलेले सांड पाण्याचे डबके