सोयगाव तालुक्यासह येथे पळसखेडा श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभयत्रा
सनातन हिंदू धर्म रक्षक ग्रुप पळासखेडा
प्रतिनिधी ..संतोष गर्दे ..
जिल्हा संभाजीनगर..
सोयगाव तालूक्यातील पळसखेळा येथे आज रामनवमी गावामध्ये श्रीराम नवमी निमित्त हनुमान मंदिरामध्ये रंगबिरंगी फुलांच्या आकर्षण कमानी लाइटिंग यांनी सजवलेल्या होता आणि मंदिरा मध्ये किर्तन भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणात मंदिरामध्ये वातावरण भारावून गेले होते सायकांळी भव्य अशी मिरवणूक व शोभयत्रेचे अयोजन केले होते यावेळी गावातील नागरीक व महिला मोठया संख्येने उपस्थीत होते
यावेळी महदेव मंदिरासमोर येथील प्रथम नागरीक सरपंचपती राजू रेकनोद व सुरेश कवाळ यांच्या हस्ते आरतीचा कार्याक्रम ठेवण्यात आला होता
ही भव्यदिव्य अशी मिरवणूक डि जे तसेच पालखी स्वरूपात राम नामाच्या गजरात महादेव मंदिरापासून सूरवात करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या वेळेस राम भाक्त चा संख्या मोठया प्रमाणावर दिसून आली तसेच गावातील महिलाची ही संख्या विलषणीय होती