पाचोऱ्यात बंद घर फोडून चोरट्यांनी पैसे व दागिन्यावर मारला डल्ला..

सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

पाचोरा शहराच्या भडगाव रोडवरील समृद्धी नगरच्या मागील बाजूस, गोपाल कृष्ण नगर रोड वरील बंद घराचे कडी कोंडा तोडून कपाटातील सुमारे पाच हजार रोकड व लहान मुलाचे कानातील सोन्याच्या बाळ्या, पायातील चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी दि.23 जुन सकाळी उघडकीस आली.सदर घरमालक रोहिदास पाटील रविवारी आपल्या गावी अंतुर्ली येथे गेले असता ही घटना रविवारी रात्री घडली, रोहिदास पाटील आज सकाळी घरी आल्या असता त्यांना दाराचे कुलूप दिसून आले नाही.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसून आले, रोख 5 हजार रुपये व लहान मुलांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना समजले.या प्रकरणी घरमालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.