घाणेगाव तांडा येथे डरामनालीचे काम अर्धवट.
डरमणालीचे पाणी गावाच्या बाहेर न वळवता धाबे न करता ठेकेदार इंजिनिअर गायप
शासनाची लाखो रुपयांची उधळपट्टी करीत इंजिनीयर ठेकेदार झाले मोकळे.
छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
आता पहा गावाची खरी परिस्थिती डरमनालीचे पाणी नाली मधी सासल्यामुळे गावात मच्छर डासाचा प्रमाण
मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
पावसाळ्याचे दिवस असून हा प्रकार जास्त प्रमाणात डेंगू मलेरिया असे आजारांना गावातील लहान मुलं जास्त प्रमाणात आजारी पडत असून गावात आजाराचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाचे पैशाचे लाखो रुपयांची उधळपट्टीकडून ठेकेदार इंजिनियर हे गायब झाले आहे दीड दोन महिन्यापासून नालीत पाणी साचल्याने गावात मच्छराचा प्रमाण दासाच्या स्वरूपात आहे मात्र या बाबीकडे वरिष्ठ यांनी दुर्लक्ष केले आहे
तक्रारदार सुनील यवतराज चव्हाण रहिवासी घाणेगाव तांडा वारंवार लेखी तोंडी तक्रार करूनही अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहे
गावाची परिस्थिती सर्वत्र मच्छर डासाचा प्रमाण मोठ्या प्रमाणात गावात पसरले आहे पावसाळ्याच्या दिवसात रात्रीचे वेळेस विज गुल लपंडाव सुरू असते लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत घराच्या बाहेर किंवा घरात रात्रभर झोपू शकत नाही अशी परिस्थिती गावकऱ्यांची झालेली आहे दिवसा गावात सार्वजनिक ठिकाणी बसणं कठीण झाला आहे यामुळे गावकऱ्याच्या आरोग्याला धोका असून लवकरात लवकर या बाबीकडे लक्ष देत वरिष्ठ अधिकारी यांनी गावात येऊन चौकशी करण्यात यावी व अर्धवट काम पूर्ण करण्यात यावा डरामणालीचे पाणी गावाच्या बाहेर वळवण्यात यावा अशी मागणी घाणेगाव तांडा येथील रहिवासी सुनील चव्हाण पत्रकार व समस्त गावकरी मंडळी करीत आहे.