जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था शिवाजी विद्यालय व महाविद्यालय सावळदबारा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा..
सोयगाव ता..
प्रतिनिधी संतोष गर्दे..
शिवाजी विद्यालय सावळदबारा येथे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सकाळी 6: 45 वाजता विद्यार्थी व शिक्षक यांच्यामार्फत योगा दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम योग मास्तर व शारीरिक शिक्षण भास्कर खमाट सर यांनी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले आयुष्यात व्यायाम व योगा का महत्त्वाचा आहे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व प्रत्येकाकडून योगा केव्हा व कसा करावा याचे महत्त्व सांगितले वर्ग पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी योगासाठी विशेष उपस्थिती दर्शवली यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते यांनी योग दिना बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर त्यांच्या या प्रस्तावाला 177 देशांचा पाठिंबा मिळाला. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये दररोज योगा व व्यायाम करावा आणि संतुलित व सकस असा आहार घ्यावा जेणेकरून तुमचे आयुष्य आनंदी निरोगी व सदृढ राहील यावेळेस विद्यार्थी गावातील पालक व शिक्षक डॉ जयराम घोती विजय सिंग राजपूत सुदाम राठोड कुंदा व्यवहारे भास्कर ससाने विनोद जाधव विकास पाटील संजय जोशी ज्ञानेश्वर राठोड पोपटराव सोनवणे भूषण देसले गणेश मोहने दीपक सिसोदे अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते दीपक सपाटे पंजाबराव शेळके योगेश तोटे विनोद चव्हाण अजय रबडे व इतर शिक्षक व शिक्षकेत तर कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली