*अजिंठा येथील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय अड्ड्यावर छापा*

प्रतिनिधी संतोष गर्दे

*आंतरराज्यीय महिलेसह तीन महिलांची सुटका*

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा हद्दीतील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट ॲन्ड बार येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा आंतर राज्यातील महिलेसह तीन महिलांची सुटका,
अजिंठा हद्दीतील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट ॲन्ड बार मध्ये वेश्याव्यवसाय सुरू आहे अशी माहिती पोलीसांना मिळाली असता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर व पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्या पथकाने वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट ॲन्ड बार येथे बनावट ग्राहकासह सापडा रचून पिटा ऍक्ट प्रमाणे कारवाई करून वेश्याव्यवसायात अडकलेली पश्चिम बंगाल येथील एक महिलेसह महाराष्ट्रीयन दोन पिडीत महिलांची सुटका केली, व दोन आरोपी एक रफिक खान अजमेर खान वय ३५ वर्ष दुसरा आरोपी आजिनाथ प्रभू लोखंडे वय २५ वर्ष दोघे राहणार अजिंठा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वर कारवाईत करत मोबाईल, निरोध पाकिटे व रोख रक्कमसह एकूण २२ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर अजिंठा पोलीस ठाणे येथे आरोपी विरूद्ध अनैतिक देह व्यापार अधिनियम १९६५ च्या कलम ३,४,५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली AHTU पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे, पोलीस अंमलदार दिलीप सांडूजी साळवे, कपिल बनकर, इर्शाद पठाण, भाग्यश्री चव्हाण, मनिषा साळवी, मंजुषा हातकंगणे, सपना चरावंडे यांनी कारवाई केली आहे,
*द व्हॉइस न्यूज तालुका प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजी नगर*