पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान सावळदबारा नगरीत आगमन..
…..
पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान:पहिल्याच वर्षी श्री क्षेत्र ऋषीगड महालब्धा मोलखेडा
शेकडो वारकऱ्यांचा सहभाग
…
सोयगाव तालुका..
प्रतिनिधी.. संतोष गर्दे..
सोयगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र ऋषिकेश महालब्धा मोलखेडा येथून सावळदबारा मार्गे श्री क्षेत्र पायी दिंडी वारी पंढरपूरकडे प्रस्थान वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. तर राज्यातून अन्य ठिकाणी असलेल्या विविध श्रद्धाळू आपल्या गावाकडून या दिंडीत सामील होत असताना दिसून येत असतात असाच एक सोहळा पहिल्याच वर्षात अग्रस्थानी चांगला प्रतिसाद दिला. तो म्हणजे श्री क्षेत्र ऋषीगड महालब्धा मोलखेडा पंचक्रोशी ते श्री क्षेत्र पंढरपुर
श्री संत ऋषी महाराज पायीदिंडी सोहळा श्री संत महाराज संस्थान श्रीक्षेत्र ऋषिगड महालब्धा मोलखेडा ता. सोयगांव
महानयोगी श्री संत ऋषीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीमधुन प्रथमच श्री क्षेत्र ऋषीगड ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तरी ज्या भाविकांना दिंडीसोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे असेल. त्यांनी मंगळवार दि. १७/०६/२०२५ रोजी श्री संत ऋषीमहाराज संस्थान श्री क्षेत्र ऋषीगड महालब्धा आश्रम या ठिकाणाहून प्रस्थान करावे पहिल्याच दिवशी सावळदबारा या ठिकाणी राजू गलबले यांच्या राहत्या घरी व गणेश बावणे यांनी दिंडीतील भक्तांना चाय पाण्याची व्यवस्था केली होती गावातील भक्त मंडळांनी पालखीचे पूजन केले. पायी दिंडी सोहळ्याचे पाई दिंडी सोहळ्याचे १७ जून रोजी पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले आहे. पायी दिंडीसाठी परिसरातील शेकडो वारकरी या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत.