सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील बस स्टँड जवळ असणाऱ्या नाल्यावरील
प्रतिनिधि संतोष गर्दे
पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून जवळपास पाच फूट वर पाणी वाहत होते त्यामुळे दुतर्फा ४ते५ तास लोक अडकून राहिलेली होती त्यावेळेस हा पूल करण्याची मागणी जोर धरत होती या विषयाला 1 वर्ष होतं आलंय मात्र या पुलाच्या कामाकडे आमच्या प्रिय नेत्यांचं लक्ष केंद्रित होत नाही.
सहा महिन्यापूर्वी या पुलाच्या कामासाठी ठेकेदाराची संपूर्ण टीम आलेली होती मात्र असं काय घडलं की आठ दिवस ज्यांना साहित्य आणायला लागलेत त्यांनी एका दिवसात संपूर्ण साहित्य घेऊन येथून पळ काढला.
आता शाळा सुरू झालेले आहेत दररोज या मार्गावरून जवळपास 500 विद्यार्थी प्रवास करत असतात.
हा पुल अत्यंत जीर्ण झालेला आहे वारंवार नेत्यांकडे हा विषय मांडून सुद्धा यावर त्यांच्याकडून कुठलीच उपाययोजना केली जात नाही याचीच खंत पळसखेडा येथील ग्रामस्थ करत आहे