*जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.*

आज दिनांक 16 जून 2025 वार सोमवार रोजी सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा शाळेतील इयत्ता पहिलीत नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांची सावळदबारा गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढून , नवंगताचे गुलाब पुष्प , गुच्छ देऊन विद्यार्थी व पालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके , दप्तर, व लेखनोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सावळदबारा शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जाफर तडवी , सरपंच महम्मद आरीफ महम्मद लुकमान, केंद्र प्रमुख श्री जनार्धन साबळे सर , केंद्रीय मुख्याध्यापक श्री विठ्ठल राठोड सर,शिक्षण प्रेमी मुनाफ सय्यद , हय्युम खा, शुभम गोडांबे, कपिल कळसकर , योगेश , सोळुंके, अनिल चव्हाण सर , गजानन गवई सर, भागवत गायकवाड सर , मदन मुठाळ सर, शबाना तडवी मॅडम, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.