वाकोद प्रतिनिधी. दीपक गायकवाड…काल दिनांक 16 जून 2025 वार सोमवार रोजी जि प केंद्र शाळा वाकोद येथे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरामध्ये सकाळी गावात नवगत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर शाळेमध्ये नवीन प्रवेशित मुलांचे पुष्पगुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमादरम्यानच शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुलांना पाठ्यपुस्तके , बूट्स
पायमोजे व गणवेशाचे औपचारिक मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी गावातील पालक केंद्रप्रमुख श्री हेमंत पाटील सर
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गायकवाड तथा शिक्षणप्रेमी विनोद राऊत गावातील जेष्ठ नागरिक माता भगिनी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संतोष पाटील सर यांनी केले.