विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी लेझिम च्या तालात स्वागत
—————————————
विद्यार्थ्यांना पुष्पगुछ व पाठ्यपुस्तके देऊन केले स्वागत
—————————————-प्रतिनिधी संतोष गर्दे

तोंडापूर ता जामनेर येथील श्रीमती रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी लेझिम नृत्यावर विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष दिगबर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक पी डी रोनखेडे पोलीस पाटील जितेंद्र पाटील कैलास कोळी गोपाल् पाटील सतीश बिराडे श्रावण जोशी
आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी नवनियुक्त मुख्याध्यापक पी डी रोनखेडे यांनी आपल्या प्रास्तविकातून शाळेत वर्षभरात राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली तसेच दिगंबर पाटील यांनी नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनक केले तर आभार एस पी पाटील यांनी मानले