प
ळसखेडा येथे वटपोर्णिमा उत्साहात साजरा..
पळसखेडा प्रतिनिधी. पळसखेडा येथील महादेवाच्या मंदिराजवळील वडाच्या झाडाजवळ सौभाग्यवती गृहिणी पूजा करण्यासाठी दिवसभर रांग लागलेली होती.हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केलं जातं. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. असे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे.. पूर्ण गावामध्ये या सणासाठी स्त्रियांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आनंदाने उत्साहात साजरा करतात व या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.