फर्दापूर: सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसखेडा
प्रतिनिधि संतोष गर्दे
शिवारात परराज्यातील बाप लेकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.८ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.विनोद रमेश डूडवे (वय.३५) व मनोज विनोद डूडवे (वय.७ रा. ढोलकोट ता. नेपानगर जि.बुऱ्हाणपूर) असे घटनेत मृतांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार,मृत विनोद डूडवे हे आपल्या कुटुंबासह गेल्या वर्षाभरापासून पळसखेडा येथील शेतकरी मनोज रामसिंग शेवगन यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करत होते.शेवगण यांच्या गट.नं.२३० मध्ये असलेल्या शेततळ्यात रविवारी सायंकाळी विनोद डूडवे व मनोज डूडवे यांचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला.घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदरील मृतदेह ताब्यात घेत शविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालय सोयगाव येथे पाठविण्यात आले.मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.या घटनेची फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि सुग्रीव चाटे,पो.ना.निलेश लोखंडे करीत आहे.