सोयगाव येथे बकरी ईद उत्साहात साजरी
सोयगाव,दि.८( प्रतिनिधी)संतोष गर्दे
सोयगाव येथे बकरी ईद सण उत्साहात साजरा झाला.ईद निमित्त मुस्लिम बांधवानी शहरातील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली.सकाळी ८:०० वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजला सुरुवात झाली होती.नमाज नंतर मुस्लिम – हिन्दू बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पहायला मिळाला.तर संपूर्ण शहरात सर्व धार्मिय बांधव एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देतांना दिसले.
ईदगाह येथे बकरी ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर,सोयगाव बीट जमादार राजू बरडे,सादिक तडवी, होमगार्ड योगेश बोखारे,ऋषी काळे,कडूबा बावस्कर,विनोद इंगळे,विजय चौधरी सह सर्व सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.व
उपस्थितांना बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या.
सोबत फोटो –