राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी ; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेप्रतिनिधि संतोष गर्देपक्षाकडून तहसील कार्यालय येथे निवेदन.
तभा.वृत्तसेवा
सोयगाव,दि.६ जून
महायुती सत्तेवर येण्याच्या येण्यापूर्वी गोरगरीब शेतकरी व लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाचे पूर्ततांना न केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवन दादर येथे जिल्हास्तरावरील राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख यांची एक महत्त्वाची बैठक घेऊन महायुतीने दिलेले आश्वासनाचे पूर्तता न केल्याबद्दल क्या हुआ तेरा वादा हा उपक्रम घेऊन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये व तालुका स्तरावर निवेदन देण्याचे कळवले असताना तालुक्यातील तालुका प्रमुख व शहरातील शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायतचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तसेच तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये जाऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी महायुती सरकारच्या विरोधात निवेदन सादर करण्यात आले.राज्य सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी महायुतीने गोरगरीब शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त करू तसेच लाडक्या बहीणला पंधराशे रुपयांच्या ऐवजी २१०० रुपये प्रति महिना देऊ ही आश्वासन दिली होती मात्र ही आश्वासन धूळ खात पडत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे चा पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत तालुकास्तरावर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मंचे यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार चैनसिंग बहुरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना सोयगाव तालुकाप्रमुख दिलीप मचे,तालुका संघटक गुलाबराव कोलते पाटील, सोयगाव शहर प्रमुख रविंद्र काटोले,उपशहर प्रमुख सुरेश फुसे,उपशहर प्रमुख दीपक बागुल,धोंडू पाटील,शंकर इंगळे,योगेश रोकडे,विठ्ठल भारुडे,पांडुरंग भारुडे,संजय सपकाळे,
यांच्यासह तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सोयगाव तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
सोबत फोटो –