जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
सोयगाव,दि.६ ( प्रतिनिधी )
उपक्रमशिल शाळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे दि.६ जून शुक्रवार रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.यावेळी नगरसेवक गजानन कुडके,शिक्षण प्रेमी योगेश बोखारे,समाजसेवक शंकर जेठे,मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सुनिल गरुड,आदीत्य श्रीखंडे यांच्या सह पालक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,प्रशिक्षक शिक्षक शुभम देसले यांनी परीश्रम घेतले.
सोबत फोटो –