शेंदुर्णी येथे श्री त्रिविक्रम मंदिरात विविध मुर्त्यांची होणार प्रतिष्ठापना, कीर्तन, शोभायात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
शेंदुर्णी नगरीचे ग्रामदैवत असलेल्या भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात लक्ष्मी माता,राही माता, श्री.गणेश, श्री.शनैश्वर महाराज,गरुड, हनुमंत, श्री शिवलिंग , श्री नंदी विविध मुर्त्यांची प्रतिष्ठापणा होणार असुन शुक्रवार ते रविवार तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी ३ वाजता या मुर्त्यांची शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार असुन पुरोहित मंडळींच्या वेद मंत्रोच्चारात तीन दिवस हा सोहळा संपन्न होणार आहे.या निमित्ताने दररोज रात्री हरि कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.हभप.पांडुरंग महाराज आवारकर,हभप.भरत महाराज बेळीकर,हभप मनोहर महाराज देव यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी यांची साथसंगत लाभणार आहे.
तरी भाविकांनी,नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री.भगवान त्रिविक्रम देवस्थान शेंदुर्णी व समस्त वारकरी संप्रदाय तसेच शेंदुर्णी ग्रामस्थ यांनी केले आहे.