सोयगाव बसस्थानक येथे लालपरीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधि संतोष गर्दे
सोयगाव,दि.३( प्रतिनिधी )
सोयगाव बसस्थानक आणि बस आगारात एस.टी.चा ७७ वा वर्धापन दिन केक कापून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सोयगाव बसस्थानक रांगोळी,फुलांच्या माळांनी सजवलेले बस स्थानक,व पताका लावून साजविण्यात आले होते.बसस्थानकावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आगार प्रमुख मनीष जवळीकर,सोयगाव शहरातील रहिवासी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख मोती जोहरे,उपस्थित होते.यावेळी आगार प्रमुख मनिष जवळीकर यांनी एस.टी.महामंडळ देत असलेल्या समाजिक सवलतींचा लाभ जास्तीत जास्त प्रवश्यानी घेऊन एसटी ने प्रवास करण्याचे आवाहन वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रवाशी यांना केले केले.केंद्रप्रमुख मोती जोहरे यांनी एसटी बद्दल आपले मनोगत व्यक्त करून एस.टी.संबंधित जुन्या आठवनींना उजाळा दिला.बसस्थानकावर फुलांनी सजविलेल्या एस.टी.सोबत केक कापून आणि प्रवाश्याना पेढे वाटून आणि पुष्पगुच्छ देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमासाठी ज्येष्ठ प्रवासी दगडू आस्वार,रंगनाथ देहाडराय,विजय जोशी,योगेश बोखारे पाटील,सरोदे बाबा,वाहतूक निरीक्षक सतिश अंभोरे,लिपिक सतिश पाटील,शेख नसीम,समाधान जाधव,जयराम सूर्यवंशी,ज्ञानेश्वर वाडेकर,मधू शिंदे,माणिक मुरमुरे,दिनकर लवटे,गौतम बनसोडे,जोहेब तडवी,अशोक तायडे,यांचे सह मोठ्या संख्येने प्रवासी,चालक आणि वाहक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतिश पाटील आणि आभार प्रदर्शन समाधान जाधव यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पगारे,नाना शेरे आणि सतिश नेरपगारे यांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो –