वाकोद येथे वारकरी बाल संस्कार शिबिर उत्साहात संपन्न..

दीपक गायकवाड-वाकोद प्रतिनिधी…. दिनांक 20 मे पासून श्रीराम मंदिर वाकोद येथे सुरू असलेले बाल संस्कार शिबिर 30 मे रोजी संपन्न होत आहेत… या शिबिरामध्ये वयाच्या सहाव्या वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत मुलं व मुली यांच्यासाठी बाल शिबिराचे आयोजन हभप बाळकृष्ण महाराज जाधव. व ह भ प श्रीकृष्ण महाराज वानखेडे.. यांनी केले… या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजेपासून प्रार्थना योगासन ओंकार सूर्यनमस्कार तसेच भजन अभंग टाळ मृदंग असे कार्यक्रम सकाळी 6 ते 12 व दुपारी 3 ते 6 या वेळेत दररोज चालायचे . या कार्यक्रमांमध्ये आपले महाराष्ट्रीयन संस्कृती संत जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानेश्वर व सर्व संतांची माहिती.. व तीर्थक्षेत्राचा महिमा सांगितला जायचा.. तसेच शिबिरामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सकाळी गावकऱ्यांच्या सहभागातून नास्त्याची व्यवस्था केलेली असे.. यामध्ये 80 विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी नाव नोंदवले होते.. तसेच 29 मे रोजी गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांची पावल्या खेळत हरिनामाचा गजर करत दिंडी मिरवणूक ही करण्यात आली. तसेच शिबिरासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी प्रमाणपत्र देऊन सन्मानित ही करण्यात येणार आहे.. व सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रमही गावकऱ्यांच्या सहभागातून होत आहे.. यामध्ये बरेचसे पंचक्रोशीतील भक्तगण व गावातील ग्रामस्थांचा मोलाचे सहकार्य लाभले.