नांदागाव येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प अंतिम टप्प्यात..

सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा जवळ असलेले नांदागाव येथील शेतकरी शक्ती ठाकुर यांच्या 40 एकर शेतात उभारण्यात आलेल्या रवींद्रा एनर्जी लिमिटेड सोलर प्रोजेक्ट कंपनीचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प सद्यास्थीअंतिम टप्प्यात असून सावळदबारा येथील जर जरी इंडियन गॅस एजन्सी गोडाऊन च्चा समोरुन जिथं जिथं अडचण होत आहे तिथे अंडरग्राउंड सोलर ऊर्जा प्रकल्पाची मेन तार जमीन खोदून तीन फूट खोलीपर्यंत नाली करून मेन लाईन चे जाड वॉटरप्रूफ केबल टाकण्यात येत आहे व जेथे पोल वाकलेली आहे ते पोल ही सरळ करण्याचं काम चालू आहे सौर कृषी वाहिनी प्रकल्प नव्वद टक्के कामे झाली आहेत उर्वरित दहा टक्के कामे महिनाभराच्या आत आटोपण्यात येणार आहे सावळदबारा येथील 33 के.व्ही. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना थोडाफार का होईना भार कमी होऊन आठ तास वीज पुरवठा मिळणार आहे