गाय गोठा, घरकुल विहीर योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची दिलीप मोरे यांची मागणी
प्रतिनिधि संतोष गर्दे
सोयगाव तालुक्यात
गाय गोठा, विहीर, घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार
सोयगाव तालुक्यामध्ये
गाय गोठा योजने चे बजेट ( अनुदान ) दोन तीन वर्षांपासून गायब शेतकरी मोठ्या संकटात या प्रकरणी अन्याय ग्रस्त लाभ धारक शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्या साठी दिलीप मोरे लवकरच करणार सोयगाव पंचायत समिती कार्यालया समोर तीव्र आंदोलन अशी प्रतिक्रिया दिलीप मोरे यांनी दिली
वरिष्ठ अधिकारी करत आहे अजब गजब मनमानी कारभार सोयगाव तालुक्यामध्ये अनेक गावातील लाभधारक व शेतकऱ्यांनी गाय गोठा विहीर घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल केले असता त्यांचे अर्ज मंजूर होऊन अनेक शेतकऱ्यांनी व लाभधारकांनी नियमानुसार विहीर गाय गोठे व घरकुल बांधलेले आहे यात घरकुल मंजुरी साठी किंवा बिल काढण्या साठी इंजिनिअर, ग्रामसेवक, सरपंच, तथा कोणताही पुढारी पैशांची मागणी करत असेल किंवा अडवणूक पिळवणूक करत असेल तर त्यांच्या वरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे तर काही किंचित शेतकऱ्यांना गाय गोठा योजने चे अनुदान मिळाले आहे आणि अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे बाकी अनुदानचा पैसा कुठं झाला गायब ट्रिपल इंजन सरकार फक्त झोपा घेत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे शेकऱ्यांना वाऱ्या वरती सोडून शासन नेमकं काय करत आहे सोयगाव तालुक्याची पंचायत समिती शासकीय यंत्रणा लाभधारकांसोबत करीत आहेत दुजाभाव अनेक शेतकरी लाभधारक संकटात शासन प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प ही गाय गोठा योजना फसवेगिरी योजना ठरलेली आहे जर अनुदान नसताना ही शेतकऱ्यांना गाय गोठे का बांधण्यात सांगितले आणि शेतकऱ्यांनी गाय गोठा योजना बांधून पूर्ण केल्यावर सुद्धा त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही काम पूर्ण करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही त्यांचे बजेट थांबविण्यात आलेले आहे हा शेतकऱ्यां वरती अन्याय अत्त्याचार लादण्यात येत आहे हा खूप लाजिरवाणा प्रकार सोयगाव तालुक्यामध्ये होत असून त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी लाभधारक मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहे फक्त किंचित शेतकऱ्यांसाठीच गाय गोठ्यांचे बजेट आहेत का इतर गोरगरीब शेतकऱ्यांसाठी बजेट का नाही अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून गाय गोठा योजना पूर्ण केल्या तसेच घरकुलामध्ये इंजिनियर टवाळखोरेपणा करून अडवणूक पिळवणूक करून खोटी माहिती देऊन यामध्ये पैशांची देवाण-घान करून बिल काढण्याचा सर्रासपणे गोरख धंदा करीत आहे या योजनांमध्ये ज्या नालायक कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी पैशांची देवाणघेवाण करून भ्रष्टाचार केलेला आहे या संदर्भामध्ये याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्यात यावी आणि या दोषी आढळलेल्या इंजिनियर तथा वरिष्ठ अधिकारी यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सोयगाव तालुका उपाध्यक्ष दिलीप मोरे यांनी मागणी केली आहे