सोयगाव तहसीदार कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांचा बेजबाबदार पणा सुरु याच मनमानी कारभाराला कंटाळून
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तहसील कार्यालया मधे शेतकऱ्याने पेट्रोल ने स्वता केला पेटवून घेण्याचा केला प्रयत्न. वडिलोपार्जित जमीन चा फेर होत नसल्या कारणा मुळे नैराश्यातून दिला होता आत्मदहनाचा इशारा मात्र पोलीस प्रशासन यांच्या सतर्क ते मुळे टळला हा अनर्थ शेतकऱ्यांची अडवणूक पिळवणूक सोयगाव तहसील कडून होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील मयत शेतकरी व माजी सैनिक सुदाम बिंदवाल यांचे पुत्र विशाल सुदाम बिंदवाल यांची वडिलोपार्जि जमीन आहे परंतु त्यांचे वडील सहा ते सात वर्षां पूर्वी मयत झालेले असून त्या जमीन चा फेर करण्यासाठी सोयगाव तहसील कार्यालयात अनेक अर्ज केले तसेच अनेक चकरा ही मारत आहे सद्याला विशाल बिंदवाल हे छत्रपती संभाजी नगर येथे राहतात त्यांना या कामा साठी सोयगाव गोंदेगाव येथे लांब प्रवास करून यावे लागते तसेच अनेक दिवसां पासून तक्रार अर्ज विनंती अर्ज करून ही अद्याप तहसीलदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही फक्त सुनावणी घेण्यात आली मात्र या जमीन चा फेर आज ही धुळखात पडून आहे असे विशाल बिंदवाल यांनी सांगितले तसेच त्यांच्या आई सतत आजारी असतात त्या ही तहसील ला नेहमीच चकरा मारत आहे परंतु येथील कर्मचारी अधिकारी यांना दया मया येत नसून हे कोणतीही दखल घेत नसून पूर्ण पणे कठोर झालेले असून विनाकारण त्रास देत असल्याचे सांगण्यात आले विशाल बिंदवाल यांनी छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी यांना ही निवेदन देऊन हा पूर्ण प्रकार सांगितला आहे तरी ही अद्याप कोणती ही दखल घेतली गेली नाही त्याच मुळे या जाचकला कंटाळून शेवटी आत्मदहणाचा इशारा दिला होता परंतु सोयगाव तहसील चे कर्मचारी अधिकारी यांनी या प्रकरणी दखल घेतल्या नसल्या मुळे सोयगाव तहसीलदार यांच्या कार्यालयात शेतकरी तथा माजी सैनिक यांचा मुलगा विशाल बिंदवाल यांनी आत्मदहना साठी सोबत दोन पेट्रोल च्या बिसलेरी बॉटल आणल्या होत्या आणि अंगावर्ती पेट्रोल टाकून पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असताना सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दांडगे व इतर पोलीस कर्मचारी यांच्या सतर्कता मुळे हा अनर्थ टळला अशी माहिती आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याने दिली
या वेळेस तहसीलदार मनीषा मेने यांनी आश्वासन दिले कीं लवकरात लवकर तुमचे काम मार्गी लावण्यात येईल त्या मुळे हे आत्मदहन तूर्तास तात्पुरते थांबविन्यात आले
अशी माहिती तक्रारदार विशाल बिंदवाल यांनी दिली
जर न्याय न मिळाल्यास परत तीन में ला आत्मदहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.