*गरुड विद्यालयाची यशाची परंपरा कायम,यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा*
धी शेंदुर्णी एज्यु.को ऑप सोसायटी
लि.संचलित,
आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे सन 2024,2025 मध्ये पार पडलेल्या एस.एस.सी परीक्षेत, सेमीचा निकाल 100℅ लागलेला असून, विद्यालयाचा सरासरी निकाल निकाल 93.90℅लागलेला आहे. विद्यालयातून410 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी 385 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष प्राविण्याने 165 विद्यार्थी व प्रथम श्रेणीमध्ये 150 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये 62 विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेली विद्यार्थ्यांनी यशस्वी मुकेश ओव्हाळ हिला 95.60 टक्के तर द्वितीय विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी संतोष काबरा हिला 95.40% मिळालेले आहेत तसेच तृतीय विद्यार्थिनी श्रावणी विशाल ढगे हिला 95℅ चौथी विद्यार्थिनी वैष्णवी भूपेंद्र पाटील 94.20% पाचवी विद्यार्थिनी कुमारी ईशा सचिन पाटील 94% श्रुती विनोद पाटील 93.60% अक्षरा राजेश कुमार बैरागी 93.60% चैतन्य श्यामलिंग कुर्लेकर 93.40% ध्रुव भूषण देवकर 93% हर्षदा विनोद पाटील 92 80 टक्के शुभम गणेश सपकाळ 92.60℅ या सर्व यशस्वी विद्यार्थ्यां चा गुण गौरव सोहळा महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात पार पडला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड हे अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्या समवेत संस्थेचे सचिव काकासो.सागर मलजी जैन, सहसचिव दादासो यु यु पाटील संस्थेचे वस्तीगृह सचिव गो.गो सूर्यवंशी, सुधाकर अण्णा बारी,शांताराम बापू गुजर, उल्हास पाटील माजी नगरसेवक जामनेर शिवाजी पाटील,पालक संतोष काबरा, पत्रकार दीपक जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भोळे,उपप्राचार्य श्याम साळुंखे,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी,पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे,विनोद पाटील, वर्गशिक्षक आर के गरुड,एल.पी मोहने, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा मोठ्या दिमाखाने पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चौधरी यांनी केले तर शुभेच्छा पर मनोगत सचिव सागरमलजी जैन, सहसचिव यु.यु पाटील,पालक संतोष काबरा यांनी केले.विद्यार्थी मनोगत यशस्वी ओव्हाळ, ईशा पाटील या विद्यार्थिनींनी केले.अध्यक्षीय मनोगतात संजयदादा गरुड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना संबोधित करत आपण सर्वांनी यशाची उंच शिखर गाठावीत तसेच येणाऱ्या काळात क्लास वन आयपीएस अधिकारी होऊन आपल्या गावाच्या,संस्थेच्या व शाळेच्या लौकिकात भर टाकावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी दूरध्वनी द्वारे संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके व कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड यांच्याकडून शुभेच्छा प्राप्त झाल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी जी पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक व्ही. एम शिरपुरे यांनी मानले तद्नंतर कार्यक्रम संपन्न झाला.