वाकोद येथे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…,

दीपक गायकवाड…वाकोद प्रतिनिधी…. वाकोद येथील ग्रामस्थांनी व सर्व युवकांनी एकत्र येऊन श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दिनांक 14 मे 2025 रोजी सकाळी नऊ वाजता उत्साहात साजरी केली. प्रथम सर्व युवकांनी एकत्र येऊन स्टेज डेकोरेशन तयार करून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व प्रथिनेस पुष्पहार अर्पण करून सर्व ग्रामस्थ व युवकांनी महाराजांचा जयघोष करून उत्साहात जयंती साजरी केली… व 18 मे 2025 रोजी श्री धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त ह भ प कबीर महाराज अत्तार यांचा रात्री 8 वाजता जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. व सर्व ग्रामस्थांनी व सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले..