तथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त धम्मसेदना, कँडल मार्च व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन…
सोयगाव तालुका ..
प्रतिनिधी.. संतोष गर्दे..
सोयगाव तालुक्यातील निसर्गरम्य अजिंठा लेणी परिसरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंन्स्टिट्युट ऑफ पाली अॅण्ड बुध्दीझम ७४ एकर परिसरातील धम्माचल फर्दापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सालाबादप्रमाणे वैशाख पौर्णिमा च्या दिवशी, दि.१२ मे २०२५, सोमवार रोजी सकाळी १०:०० वा. संतगार मध्ये त्रिशरण, अष्टशील, पुजापाठ, परित्राण सुत्र पाठ करण्यात येवून. दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून सायंकाळच्या सत्रात ठीक ७ वा. पुण्यनगरी फर्दापूर गावामध्ये कॅन्डल रॅली काढण्यात येणार आहे यावेळी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित रहातील या अभिवादन कार्यक्रम तालुक्यातील गावागावांतील उपासकांनी पुण्य अर्जीत करण्यासाठी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भिख्खू बोधिधम्मा यांनी केले आहे.भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खु संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त धम्मसेदना, कँडल मार्च व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने फर्दापूर , सोयगाव तालुका परिसरातील येथील सर्व धम्मप्रेमी उपासक उपासिकांना कळविण्यात येते की तथागत भगवान बुद्ध यांच्या २५६९ वी (वैशाख पौर्णिमा) तथागत भगवान बुध्द यांची जयंती साजरी करण्यात येत असते बुद्ध धम्मात वैशाख पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. कारण याच दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म, तथागत भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती व तथागतांचे महापरिनिर्वाण झाले. वैशाख पौर्णिमा हा बौद्धांचा धर्माचा सर्वात मोठा सण आहे