*सोयगाव येथे समर्पण फाऊंडेशन व करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
दिनांक ४ मे २०२५ रोजी, आमखेडा (सोयगाव) मध्ये समर्पण फाउंडेशन कार्यालय आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा पार पडला.
प्रतिनिधी संतोष गर्दे
या कार्यक्रमास मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वरदादा नाईक व रा. स्व. संघाचे प्रांत ग्रामविकास संयोजक विलासजी दहीभाते यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते गुलाबी फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी नितेश राजपूत व अनंत जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख हर्षल फुसे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले, की सोयगाव तालुक्यातील काही स्वयंस्फूर्त तरुणांनी मिळून समाजाभिमुख काम करण्यासाठी ग्राम विकास, पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा, कृषी अशा विविध क्षेत्रात सेवाकार्य करण्यासाठी संकल्प केला. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून आम्ही गाव स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलासअण्णा दहीभाते म्हणाले, गावातल्या समस्या गावात शोधून त्याचे उत्तर गावातच शोधले पाहिजे. गावातील लोकांनी त्यावर एकत्रितपणे काम केले पाहिजे. गावातल्या उत्पादित होणाऱ्या वस्तू पदार्थांना गावातच मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे. आपण प्रथम त्या वस्तुंचा प्राधान्य देऊन खरेदी केले पाहिजे. विदेशी, ब्रँडेड वस्तूचा आग्रह सोडला पाहिजे. असे केल्यास आपले गाव आणि आपली माणसं आत्मनिर्भर होईल. समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून सोयगाव आमखेडा याठिकाणी हे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.