*लोहारा गावात तीव्र पाणीटंचाई.. तब्बल दहा दिवसांनी होतोय पाणीपुरवठा.*
*ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज.*
प्रतिनिधी
लोहारा तालुका पाचोरा
लोहारा हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचे असून या गावाचा पाण्याचा प्रश्न फार बिकट होत चालला आहे.तब्बल दहा दिवसांनी नळाला पिण्याचे पाणी मिळत आहे. ग्रामपंचायत प्रशासन साखर झोपेत आहे की काय असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडत आहे. जल जीवन मिशन ही शासनाची कोट्यावधी रुपयांची योजना गावात आणली गेली मात्र गावाला पाणी कधी मिळेल हा प्रश्न गावकऱ्यांना उपस्थित होत आहे.
दहा दिवसातून पाणी येते ते पण फक्त 45 मिनिट घरामध्ये पाच सहा सदस्य असतात पाणी दहा दिवस पुरत नाही आणि बाहेर पण विकत सुद्धा पाणी मिळत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. खाजगी पिण्याचे जार वाल्यांना कॉल केला तर ते पण लग्नाच्या ऑर्डर वर असतात म्हणजे पिण्याचा पाण्याचा किती गंभीर प्रश्न गावामध्ये आहे यावरून सिद्ध होते. गावात बस स्टँड परिसरामध्ये पिण्याचे पाण्याची पानपोई चालू केली खरं पण जारमध्ये पाणीच मिळेना अशी अवस्था पाणपोईची लोहारा गावात आहे.
लोहारा जवळील धरणामध्ये पाणीसाठा हा शून्य झाल्याने उन्हाचा मे महिना व जून कसा निघेल याची चिंता नागरिकांना सतावत आहे. पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासाठी गावातील काही नागरिकांनी अंघोळ सुद्धा केली नाही. गावातील पुढारी फक्त मत मागण्यासाठीच असतात का गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे असा देखील प्रश्न सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
लोहारा गावातील नागरिक पाणी या समस्येने ग्रासलेला असून लवकरच ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर पाणी प्रश्न मिटवावा असे ग्रामस्थांमधून सुर निघत आहेत.
*पाणीटंचाईवर काय म्हणाले सरपंच*
महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या वाघुर धरणावरील पाण्याची पाईपलाईन लवकरच पूर्ण होऊन गावाला पाणी मिळेल तसेच पाण्याचे टँकर देखील उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. तरी लवकर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सरपंच
अक्षयकुमार जैस्वाल