विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर वरील मका व ज्वारी जळून खाक मौजे शेंदुर्णी येथील गट नंबर,२९४/१लक्ष्मण दौलत

गुजर व २९४/२ मालनबाई लक्ष्मण गुजर यांच्या मालकीच्या शेतात दि ३०/४/२०२५ वार बुधवार रोजी दुपारी विजेच्या तारेचा शॉर्ट सर्किट होऊन सदर शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान त्या ठिकाणी मका आणि ज्वारीचे झालेले आहे काढण्यासाठी आलेली मका आणि ज्वारी पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेली आहे तसेच शेतकऱ्याने केलेल्या नवीन ठिबक तसेच पाईप हे सुद्धा जळून पूर्णपणे खास झालेले आहे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे तलाठी योगेश ब्राह्मणे यांनी सदर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यात ६०आर मका व४०आर ज्वारी असे पिकांचे नुकसान पिकांचे झाले आहे तसेच या शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे त्याची भरपाई शासनाने लवकरात लवकर त्यांना करून द्यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन केलेली आहे