शिष्यवृत्ती परीक्षेतील गरुड शाळेच्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शेंदुर्णी (ता. जामनेर) – शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गरुड शाळेतील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सगरमल जैन, संचालक यू यू पाटील सर, वसतिगृह सचिव गोविंद सूर्यवंशी, मुख्याध्यापक आर एस चौधरी सर, पर्यवेक्षक विनोद पाटील सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या परीक्षेत 32 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 300 पैकी 198 गुण मिळवून मनीष सचिन पाटील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
याशिवाय इतर गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे, राजलक्ष्मी मुकेश आव्हाळे – 188गुण (62.66%),नितिन संजय चव्हाण– 188 गुण (62.66%), राजनंदिनी विशाल ढगे – 178 गुण (59.33%) ,दर्शना बालमुकुंद अग्रवाल – 178 गुण (59.33%), तनिष्का दिग्विजय सूर्यवंशी – 174 गुण (58.00%) , अमित रज्जाक तडवी – 158 गुण (52.66%), प्रतीक श्रीराम बोंडे– 156 गुण (52.00%)
तसेच, आठवीचे दोन विद्यार्थी व्यंकटेश देविदास बारी, श्रद्धा किरण बडगुजर
या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष, संजय गरुड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.