शेंदुर्णी शहरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी, पहेलगाम हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली अर्पण
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
शेंदुर्णी शहर ब्राह्मण संघाच्या वतीने आज भगवान परशुराम जयंती सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन पहेलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन साजरी करण्यात आली.
श्रीराम मंदिरात शेंदुर्णी शहर ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी आदर्श शेतकरी राजेंद्र पाठक व सौ.किशोरी पाठक यांनी तसेच सर्व समाज बांधवांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन केले.आरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आले.यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करुन या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव महिला उपस्थित होत्या.