पळसखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी….…..,
पळसखेडा प्रतिनिधी….डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती 27 एप्रिल रोजी उत्साहात वाजत गाजत साजरी केली जाते. आंबेडकर जयंती, ज्याला भीम जयंती म्हणूनही ओळखले जाते..‘भारतीय संविधानाचे जनक’ डॉ. भीम राव यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. १८९१ मध्ये जन्मलेले आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. ते एक कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक देखील होते. अशा परिस्थितीत, दरवर्षी त्यांची जयंती देशभरात पूर्ण भक्ती आणि आदराने साजरी केली जाते. अशी बरीचशी माहिती सरपंच राजू एकनोद, यांनी आपल्या मनोगत ता तून व्यक्त केली. प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बगीमध्ये बसवून पूजा करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पूर्ण गावात डीजे लावून मिरवणूक काढण्यात आले मिरवणुकीस उपस्थित पोलीस पाटील गणेश घोंगडे, सुरेश कवाळ , अशोक बोराडे भगवान बोराडे संजय बोराडेतसेच फर्दापूरचे पीएसआय सुखदेव साठे व कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थित होते.. यांच्या उपस्थित सर्व कार्यक्रम शांततेत पार पडला