जरंडी जवळील अपघातात भरधाव वाहनाच्या धडकेत दोन जागीच ठार..
या अपघातात बाप व मुलगी जागीच ठार..

सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..

सोयगाव बनोटी मार्गावरील जरंडी जवळील घटना
भरधाव अज्ञात वाहनाने मोटारसायकलला मागून जोरदार धडक देऊन मोटारसायकल वर पुढे बसलेल्या पाच वर्षीय मुलीला हवेत उडवून चालक पित्याला पन्नास फूट फरफटत नेल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा जरंडी गावाजवळ सोयगाव-बनोटी रस्त्यावर घडली.
या भयंकर अपघातात बाप व मुलगी जागीच ठार झाले तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
या दुर्दैवी अपघातात अजय रघुनाथ राठोड( वय ३२ वर्ष रा.न्हावितांडा) व वैशाली (अजय) राठोड (वय ८ वर्ष रा.न्हावी तांडा) असे अपघातात जागीच ठार झालेली असून काजल अजय राठोड(वय १०) गंभीर जखमी झाली आहे. हे तिघेही जरंडी येथून निंबायती (न्हावी तांडा) येथे मोटारसायकल क्र-एम एच-१९ ए बी-३७१८ वरून जात असताना सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडी गावाजवळ मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडविले होते. यामध्ये मृत वैशाली राठोड हिस या भरधाव वाहनाने हवेत उडवून अजय राठोड(वय ३२) यास पन्नास फूट फरफटत घेऊन गेले तर काजल ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.