*विनोद सुधाकर पवार यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ कडून मानद डॉक्टरेट पदवी*
प्रतिनिधी संतोष गर्दे
जळगाव, दि. १८ एप्रिल — समाजसेवा, गांधीवादी विचारसरणीचा प्रचार आणि लोककल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल*विनोद सुधाकर पवार जळगाव* यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ यांच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
हा गौरव समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी हॉटेल IvoryTusk, जळगाव येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. राजू मामा भोळे (जळगाव शहर) हे होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून श्रीयुत सुनील सिंग परदेशी (कर्तव्यदक्ष फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष, नाशिक) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनोद पवार यांना मानद प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले .
विनोद पवार यांनी आयुष्यभर जपलेली गांधी मूल्यं, निःस्वार्थ समाजसेवा आणि माणुसकीची शिकवण आज या सन्मानाच्या रूपाने सर्वांसमोर अधोरेखित झाली आहे.
गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ कडून ही पदवी विनोद पवार यांच्या समाजकार्याचे गौरवकरणारे महत्त्वपूर्ण सन्मान आहे. त्यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!