आराध्य दैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवात उत्सवात सुरुवात झाली
सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव : सोयगाव तालुक्याचे आराध्य दैवत श्री. भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. श्री. भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त आ. अब्दुल सत्तार यांनी यात्रेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी श्री. भैरवनाथ महाराज संस्थानच्या वतीने आ. अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. आ. अब्दुल सत्तार यांनी मंदिर परिसरात भविकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, गोपीचंद जाधव,अक्षय काळे,संतोष बोडखे,रवी काळे,दिलीप बिर्ला,राजू जावळे,कुणाल राजपूत, कदीर शहा, हर्षल काळे, अशोक खेडकर, दिलीप देसाई, रमेश गव्हांडे,सुरेश चव्हाण, श्रावण जाधव, रमेश भंगी तसेच सोयगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते