दिनांक अकरा रोजी
सोयगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या व नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाड्याभर ओळख
प्रतिनिधी संतोष गर्दे
असलेल्या भैरवनाथ महाराज चैत्रपोर्णिमा यात्रोत्सवाला दि.१२ शनिवार रोजी प्रारंभ होत आहे.शहरापासून जवळच असलेल्या भैरवनाथ महाराज संस्थानचे प्रशस्त मंदिर आहे.यात्रेची अंतिम तयारी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून खान्देश व मराठवाड्यात ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात कबुल केलेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते,या ठिकाणी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकर द्वारे करण्यात येणार आहे.या ठिकाणी सकाळी वगदा-वगदी मिरवणूक,नवस कबुल केलेल्यांच्या हाताने बारा गाड्यां ओढण्याचा नवस फेडण्याची प्रथा आहे,बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते,व श्रद्धेपोटी सर्प चावल्यानंतर येथे उतरतो अशी प्रत्येक भाविकांची श्रद्धा आज हि कायम आहे.
शनिवार रोजी यात्रा सुरु होत असून जास्तीत जास्त भाविकांनी व व्यापाऱ्यांनी आपले दुकान जास्तीत जास्तीत प्रमाणे आणावे,व दर्शनाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात येत आहे.यावेळी संस्थांनचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,रविंद्र काळे,विजय अहिरे,राजेंद्र जावळे,समाधान काळे,अतुल परदेशी,राजेंद्र दुत्तोंडे,ईश्वर गंवाडे,ईश्वर सोनवणे,आदि संस्थानचे पदाधिकारी व यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य, गांवकरी,ग्रामस्थ मंडळी सोयगाव,यात्रा शांततेत पडण्यासाठी परिश्रम घेत आहे.तसेच यात्रेमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नवसाला पावणारा भैरवनाथ यात्रोत्सव उत्सवात डाळबट्टीने नवस फेडण्याची प्रथा आहे.त्यामुळे भैरवनाथ यात्रोत्सवात मंदिर प्रांगणात डाळबट्टीच्या प्रसादाची मोठी चंगळ होणार आहे.नवस कबूल केलेल्यांची नातेवाईक,सगेसोयरे,आणि परिसरातील मित्र कंपनी या यात्रेत डाळबट्टीच्या जेवणात आमंत्रित केल्या जातात.
कोट- श्री.भैरवनाथ महाराज यांची मूर्ती दुधापासून तयार होणाऱ्या लोण्याची आहे.अंदाजे १०० वर्षापासून या ठिकाणी श्री.भैरवनाथाचा बाणा (मूर्ती)असल्याचे जाणकार सांगतात कदाचित लोण्याचा देव फक्त सोयगाव परिसरात असल्याचे जुने लोक सांगतात,या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून लोक चैत्र पौर्णिमेला येत असतात.
– दिलीप बिर्ला,अध्यक्ष भैरवनाथ संस्थान