शिवसेना भवन सोयगांव येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
सोयगांव / प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव : सोयगांव येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडके, हर्षल काळे, राजू दुतोंडे, गजानन कुडके, लतिफ शहा, सलीमखा पठाण, कदीर शाह, शेख बबलू, जीवन पाटील, श्रावण राठोड, रमेश चव्हाण, जाकेर देशमुख, संभाजी पवार आदींची उपस्थिती होती