शेंदुर्णी ता जामनेर

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिनस्त संस्था यांना जागतिक आरोग्य दिन निमित्ताने दि. ७ एप्रिल, २०२५ रोजी श्री. यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे राज्याचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य, मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

सदरील कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्तम कामगिरी करणारे जिल्हे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणारे रुग्णालय, जास्त प्रसूती करणारे आरोग्य संस्था, आरबीएसके पथकातील उत्तम कामगिरी जिल्हा, असंसर्गजन्य आजारांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, सिकल सेलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, उत्तम कामगिरी करणारे SNCU, उत्तम कामगिरी करणारे ICU, तसेच गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहित जोहरे, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनी रात्रंदिवस परिश्रम घेत ४४५ प्रसूती केल्या. या मेहनतीला यश येत द्वितीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत असून सर्वत्र कौतुक होत आहे.