ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भीती :: मौसमचा मिजाज बदललेला ? तीन दिवसात गारपीट
सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव : दि, २/ ०४ / २०२५ राज्यातील बहुतांश ठिकाणी वातावरण ५ तारखेपर्यंत जास्त ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर ढगांची गर्दी वाढत बहुतांश भागामध्ये पाऊस होऊ शकतो. हा पाऊस वळीव स्वरूपाचा असल्याने सर्वत्र एकसारखा होणार नाही. आज खानदेश, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. जोरदार वारा आणि विजांच्यासह पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो. ३ तारखेस दुपारनंतर मराठवाडा, पश्चिम, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. ४ तारखेसही कोकण आणि कर्नाटक सीमेजवळच्या भागात पावसाची शक्यता आहे. ५ तारखेपासून पुन्हा वातावरण स्वच्छ होत कमाल तापमानात वेगाने वाढ होईल. अतिनील किरणांचा निर्देशांक ११ पार करेल. १८ एप्रिल नंतर पुन्हा २-३ दिवसासाठी वातावरण ढगाळ होऊ शकते.”
शेतकरी मित्रांना ॲमिकसच्या सेवेत अल्टमेट माहितीनुसार आपल्या सेवेची माहिती शेतकरी मित्रांनो