फर्दापूर अजिंठा घाटात एसटी बस व मालवाहतूक करणाऱ्या आयशरमध्ये समोरासमोर अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) सकाळी ९

प्रतिनिधी संतोष गर्दे
वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात घडली. अपघातात बसमधील ३९ प्रवाशी सुखरूप बचावले.मात्र,आयशर चालक गंभीर जखमी झाला.
अजिंठा घाटातील घोडी पटांगण जवळील अवघड वळणावर सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास जळगाव आगाराची जळगाव-पुणे एसटी बस क्र.(एम.एच २० जीसी ३६८६) ही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असतांना एका अवघड वळणावर विरुद्ध दिशेने घाट उतरत असतांना भरधाव वेगात येणाऱ्या आयशर क्र.(एम.एच.१९ झेड ४५११) हा एसटी बसवर समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला.यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील ३९ प्रवाशी बचावले.मात्र,आयशर चालक पांडुरंग मोहन पाटील (वय.५५ रा.लोणवाडी जि.जळगाव) हे स्टेरिंगमध्ये फसल्याने त्याला मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले.यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.जखमी आयशर चालकाला जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ड्रायव्हर काशिनाथ नरोटे यांनी रुग्णवाहिकेतून पहूर ता.जामनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.यादरम्यान,मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अजिंठा घाटात वारंवार त्रास सहन करावा लागतो आणि अजिंठा घाटात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे पुन्हा एकदा आज वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
