जळगावजवळ भीषण अपघात: अज्ञात ट्रकने दुचाकीस्वारला चिरडले !

महेंद्र बोंडे असे मयत तरुणाचे नाव !

नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश !

प्रतिनिधी संतोष गर्दे

जळगावजवळील खेडी फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात महेंद्र बोंडे या ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.आज सकाळी भुसावळहून जळगावकडे येत असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर महेंद्र ट्रकच्या खाली आल्याने डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे महेंद्रचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. महेंद्रचा मृतदेह बघताच जिल्हा रुग्णालयात महिंद्रच्या बहिणींसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.