्रेस नोट

सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी राजेंद्र राठोड तर व्हाईस चेअरमन पदी रंगनाथ वराडे यांची निवड

सोयगावच्या सहकार क्षेत्रावर आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व नियामक

सोयगाव ( प्रतिनिधी ) संतोष गर्दे
दि.19, सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीसाठी आज येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत चेअरमन पदी शिवसेना ( उबाठा ) जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड यांची तर व्हाईस चेअरमनपदी रंगनाथ रामदास वराडे यांची निवड झाली. या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांच्या उपस्थितीत शहरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान एका खुल्या वाहनातून नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड, व्हाईस चेअरमन व संचालकांनी शहरवासीयांचा सत्कार स्वीकारून मतदार व नागरिकांचे आभार मानले. प्रारंभी सेना भवन येथे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या विजयी रॅलीमध्ये नवनिर्वाचित संचालक प्रभाकर काळे ,संजय निकम ,सुभाष बोरसे ,मुरलीधर वेहळे, भगवान लहाने, राधेश्याम जाधव, गुलाबसिंग पवार ,चंदाबाई राजपूत, प्रतिभा सोळंके ,भारत तायडे, मोतीराम तेली यांच्यासह शिवसेना शिंदे गट व उबाठा गटाचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
————-
सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( शिंदे गट ) व शिवसेना ( उबाठा ) दोन्ही गटाचे पदाधिकारी एकत्र येवुन त्यांनी शेतकरी सहकार विकास पॅनलच्या छत्री निशाणीवर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास पॅनलचे 17 पैकी 13 उमेदवार निवडून आले. दिनांक 29 जून 2025 रविवार रोजी निवडणूक झाली होती. तर दिनांक 30 जून सोमवार रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज चेअरमन , व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.