दिव्यांगांसाठीच्या अनुदानात दरमहा १५०० वरून २५०० इतकी वाढ
सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव : केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते.
सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना १५०० इतके अनुदान दिले जात होते. हे अनुदान दरमहा २५०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे , बातमीला सहकार्य करणारे अक्षय विसपुते , रविराज गिरी दिव्यांग साठी लढणारे आमदार , बच्चू भाऊ कडू