*गरुड विद्यालयात संस्थेचा 81 वा वर्धापन दिन सोहळा जल्लोषात साजरा*

धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसा.लि. संचलित शेंदुर्णी संस्थेचा 81 वा वर्धापन दिन सोहळा आ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पूजन,माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारा नंतर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावीत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने आलेल्या विद्यार्थी बक्षीस वितरण तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दातृत्ववान व्यक्तींकडून मिळालेले शालेय गणवेश,नोटबुक सेट व शैक्षणिक साहित्य वर्धापन सोहळा निमित्त तसेच संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आले,गरुड प्राथमिक विद्यामंदिरास एका वर्गासाठी ई लर्निंग साहित्य प्रकाशराव देशमुख सेवानिवृत्त क्षेत्रीय अधिकारी जेडीसीसी तसेच संविधान फोटो फ्रेम बापूसो सुनील गरुड यांच्याकडून प्राप्त झाले.इतर दानशूर मान्यवर संस्थेच्या संचालिका ताईसो उज्वलाजी काशीद वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी,विनय कलेक्शन शेंदुर्णी उर्मिल जैन,लोकमत पत्रकार दीपकजी जाधव इत्यादींकडून प्राप्त झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्या.आर.एस चौधरी यांनी संस्थेची सुरुवात ते दादासाहेब संजयरावजी गरुड यांनी सुरू केलेली यशस्वी घोडदौड संस्थेतील गरुड विद्यालयातील नव वास्तू उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याचे व संस्थेच्या प्रत्येक विद्यालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत इत्यंभूत अशी माहिती दिली.तर संस्थेच्या वर्धापन दिना संदर्भातील संस्थेबद्दलची महती,मनोगत शालेय विद्यार्थ्यांनंतर मान्यवरांमधून संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील,ग.स.सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग सोनूसिंग पाटील,अधीक्षक खटके साहेब,माजी माध्य.पतसंस्था अध्यक्ष संभाजी पाटील यानंतर अध्यक्षीय मनोगतात दादासाहेब संजयरावजी गरुड यांनी संस्थेबद्दलची इत्यंभूत अशी माहिती सांगत संस्थेची योग्य दिशेने सुरू असलेली वाटचाल विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय यांचे लागलेले निकाल याबद्दलची शास्वती व्यक्त करत सभा मंडपाला आश्वासित केले.याप्रसंगी दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या समवेत उपस्थित असलेले संस्थेचे मान्यवर सचिव काकासो.सागर मलजी जैन, सहसचिव दादासो यु.यु पाटील,कार्यालयीन सचिव भाऊसो. दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो.गो सूर्यवंशी संचालिका ताईसो. उज्वला काशीद तसेच प्रमुख मान्यवर उपस्थिती एस.डी.भिरूड अध्यक्ष माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था,अजबसिंग पाटील अध्यक्ष ग.स.सोसायटी,आर एस बाविस्कर माजी अध्यक्ष माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था,एच जी इंगळे अध्यक्ष ज.जी माध्य.शिक्षक संघ जळगाव,संभाजी पाटील माजी अध्यक्ष माध्य.शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था,सुनीलजी गरुड मार्गदर्शक जुक्टो संघटना जळगाव,डिगंबर पाटील संचालक, इस्माईल शेख माजी सभापती प.स.पाचोरा सुधाकर अण्णा बारी माजी उपसभापती प.स.जामनेर,गोविंदजी अग्रवाल सदस्य राज्य परिषद,डॉ.किरणजी सूर्यवंशी मा.प.स.सदस्य, शांताराम बापू गुजर मा.प.स सदस्य,अमृत बापू खलसे चेअरमन पंडित दीनदयाल पतसंस्था,दगडू अण्णा पाटील चेअरमन जिनिंग प्रेस शेंदुर्णी, पत्रकार दीपकजी जाधव, दिग्विजय सूर्यवंशी, विलास अहिरे, प्रकाश झंवर,युवराज सूर्यवंशी,योगेश सोनार, प्रदीप धनगर,धीरज जैन,राजेंद्रजी पवार सामाजिक कार्यकर्ते, पंकजजी गुजर भाजपा शहराध्यक्ष, ऍड.प्रसन्न भाऊ फासे,शकूरजी शेख,अमृत धनगर,भगवान आहिरराव,दगडू गुजर,नंदू भाऊ बारी,माजी मुख्याध्यापक के बी चौधरी,माजी मुख्या.संजयजी उदार,माजी मुख्या. डी.आर शिंपी,ए.ए.पाटील,भरत पाटील,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी,पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील,इत्यादी मान्यवरांसमवेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी जी पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे यांनी मानले.