समता फौंडेशन मुंबई व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न–दिलीप शिंदे ..सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव दि.26- समता फौंडेशन मुंबई व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 बुधवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कमी वजनाची बालके तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी मधील कमी वजनाच्या बालके घेऊन आरोग्य तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते. या तपासणी शिबिरात 38 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे पथकप्रमुख डॉ.रमेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल डोके बालरोगतज्ज्ञ डॉ.अग्रवाल यांनी 22 मुलं व 16 मुलींची आरोग्य तपासणी केली फार्मासिस्ट आकाश चवरे यांनी बालकांना औषधी वाटप केले. कुपोषण मुक्तीसाठी समता फौंडेशन मुंबईच्या वतीने बालकांना निशुल्क औषधी पुरविली जाते. तपासणी शिबीर यशस्वीतेसाठी नितीन सोनवणे आरोग्य सेविका सोनाली झिंजेसह आदींनी परिश्रम घेतले.